मोहरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी लता बिऱ्हामणे तर उपसरपंच पदी सविता लेकावळे यांची निवड.
मुख्य संपादक :मंगेश पवार
कार्यकारी संपादक:सागर खुडे
भोर तालुक्यातील मोहरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सोमवारी दि. १२ रोजी लता सुहास बिऱ्हामने यांची तर उपसरपंच पदी सविता विठ्ठल लेकावळे यांची बहुमताने निवड करण्यात आली. सरपंच व उपसरपंच यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
मोहरी ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच दतात्रय लेकावळे उपसरपंच पल्लवी बिऱ्हामणे यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच, उपसरपंच पदासाठी ग्राम पंचायत मोहरी कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी लता बिऱ्हामणे व सविता लेकावळे यांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामपंचायत ग्रामसेवक ठोंबरे भाऊसाहेब यांनी लता बिऱ्हामणे व सविता लेकावळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यावेळी मा.सरपंच बाळासाहेब लेकावळे, दतात्रय झांजले तसेच मोहरी बु! कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामदास खोपडे, जिल्हा नियोजन समिती मा.सदस्य राहुल लेकावळे, यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली..या निवडीसाठी मा. उपसरपंच पल्लवी बिऱ्हामणे, शोभाताई राजगुरू, संदीप खोपडे,सोपान लेकावळे राजु आखाडे,तसेच शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष निखिल लेकावळे. दिपक खोपडे सागर लेकावळे, दतात्रय बिऱ्हामणे, राजु धनावडे .व मोहरी गावचे जेष्ठ आदरणीय असे काळुराम धनावडे,दिवानजी लेकावळे. हे सर्व उपस्थित होते.सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत सरपंच व उपसरपंच यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार, घरकुलाची कामे करणार, रस्त्यांची कामे करणार अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच लता बिऱ्हामणे व उपसरपंच सविता लेकावळे यांनी दिली आहे.


