सारोळे येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार; चार जणांसह 30 ते 40 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल
सारोळे :- राजगड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांसह सुमारे 30 ते 40 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी असिब इमाम शेख (वय 38, रा. ग्रीन ग्लोरी, केशवनगर, वडगाव मावळ, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 3.31 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान मौजे सारोळा (ता. भोर) येथे त्यांचा भाऊ इरशाद इमाम शेख (वय 40, रा. पांडे, ता. भोर) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पुजा माने, तिचा भाऊ, तिचा मामा सुशांत विजय करंजकर, ओंकार भोसले, तसेच 30 ते 40 अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या भावास शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास दिला होता. या सर्व त्रासाला कंटाळून इरशाद शेख यांनी जामा मस्जिदमधील सिलींग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे नमूद करण्यात आले आहे.
राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसइ देसाई तपास करीत आहे.