पुण्यात अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश बंद.
पुणे प्रतिनिधी: मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृहशाखा) यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत अवजड वाहनांना खालील वेळेत पुण्यात प्रवेशबंदी लागू राहील.
सकाळी ८.०० ते ११.००
सातारा–सांगली–कोल्हापूर दिशेने येणारी अवजड वाहने शिंदेवाडी (खेडशिवापूर) टोलनाक्यापुढे येणार नाहीत.
सायंकाळी ५.०० ते ९.००
नवी मुंबई–ठाणे–रायगड बाजूने येणारी अवजड वाहने उर्स टोलनाका व जुना मुंबई–पुणे हायवेवरील वडगाव फाटा यापुढे जाणार नाहीत.
मात्र अत्यावश्यक सेवांतील वाहने — पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल इ. — यांना या बंदी आदेशातून सूट देण्यात आली आहे.
या आदेशानुसार संबंधित महामार्ग सुरक्षा पोलिस केंद्रांचे प्रभारी अधिकाऱ्यांना वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विक्रांत देशमुख, पोलीस अधीक्षक (महामार्ग सुरक्षा पथक, पुणे प्रादेशिक विभाग)


