केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा न्हावीला पाहणी दौरा – कृषी फवारणी ड्रोनला मिळाले कौतुक


संपादक मंगेश पवार

कार्यकारी संपादक सागर खुडे

दि. 21 सारोळे :- केंद्र सरकारच्या वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेशन तर्फे आयोजित पाहणी दौऱ्यात कार्मिक मंत्रालयातील (Ministry of Personnel) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्हावी विकास सोसायटी व न्हावी कृषी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, न्हावी यांना सदिच्छा भेट दिली.

 

या पाहणी दौऱ्यात IAS संजीव माथुर (आर्थिक सल्लागार – कृषी, सहकार, पशु, दुग्धोत्पादन व मत्स्यपालन विभाग), IAS KMS खालसा (संचालक – कृषी वित्त व नियोजन), रियाज उल हक (उपसचिव – कृषी विभाग), अशोक कुमार (सहाय्यक निबंधक – यामिनी कॉम), प्रकाश जगताप (जिल्हा उपनिबंधक – पुणे) तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गिरीश जाधव, विजय शिवले, हेमंत भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

न्हावी विकास सोसायटी व कृषी उत्पादक संस्थेचे कामकाज, दैनंदिन व्यवहार, कर्ज वाटप धोरण यांची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली. तसेच कृषी फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाची स्थळभेट घेऊन समाधान व्यक्त केले. भविष्यात औषध फवारणीसाठी ड्रोन वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कृषी उत्पादक संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या शेतीपूरक उपक्रमांमध्ये – AI तंत्रज्ञान, खते, औषधे, बी-बियाणे विक्री केंद्र, कांदा प्रक्रिया उद्योग, मंडी इत्यादी योजनांचीही पाहणी करून अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

 

या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भोर तालुका वसुली अधिकारी विनोद काकडे, विकास अधिकारी सचिन जेधे, न्हावी कृषी उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन नवनाथ सोनवणे, संचालक सत्यजित जगताप, शैलेंद्र जगताप, विकास संस्थेचे सचिव संतोष सोनवणे, शेतकरी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!