मा.याशनी नागराजन यांची दुर्गम बामणोली भागातील तेटली शाळेस भेट.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
बामणोली : मतदान जनजागृती कार्यक्रमातंर्गत सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.याशनी नागराजन् यांनी जावली तालुक्यातील कसबे बामणोली या दुर्गम भागातील तेटली शाळेस व गावाला भेट दिली.
जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन यांनी तेटली येथील शाळेस भेट देऊन शाळेच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. शाळेतील मतदान बुथ तसेच शाळेचा परिसर, शालेय मुला मुलींचे शौचालय परसबाग वर्गखोल्या बोलके व्हरांडे,अगदी बारकाईने पाहिले. अचानक भेट देऊनही परिसर स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.
यानंतर किचन रुमची माहिती घेतली. आजचा मेनू काय आहे, त्यानुसार आहार पाहिला व चवीसाठी मागितला.इतकेच नाही तर स्वतः चालत
शालेय पोषण आहाराच्या खोलीकडे गेल्या. धान्यादी मालाची मांडणी, आजचा मेनू व त्यानुसारचा आहार आहे का हे पाहिले. मेनू नुसार आज मुगडाळ खिचडी,हरभरा उसळ व थोडीशी खीर या आहाराची चव स्वतः त्यांनी घेतली. आहाराची चव घेत असताना पुन्हा एकदा खाण्यासाठी आहार मागितला. अतिशय सुंदर व चविष्ठ आहार आहे असा शेरा दिला. स्वयंपाकी मावशीचे कौतुक करुन त्यांचा सत्कार केला. मुख्याध्यापक पवार सर सौ.पवार मँडम किरण बोंबले यांच्याशी शाळेचा पट, सेमी इंग्लिश विषयी येणाऱ्या अडचणी या वर चर्चा करून या शाळेच्या कामकाजाविषयी केंद्र प्रमुख बळवंत पाडळे मुख्याध्यापक पवार सर सौ.पवार मँडम व किरण बोंबले सर भात शिजवनाऱ्या मावशी सौ.सुशिला चव्हाण, ललिता भोसले ताई तसेच अंगनवाडीताई नंदा भोसले लिला भोसले तसेच केंद्रातील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी मा.याशनी नागराजन यांचे समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.अर्चना वाघमळे मँडम तसेच जावली प.स.चे बिडीओ मा.निलेश पाटील तसेच ग्रामसेवक श्री राऊत श्री.माने तसेच शा.व्य समितीचे अध्यक्ष अजित भोसले व सदस्य,तसेच पो.पाटील रेश्मा चव्हाण, इतर अधिकारी कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ.पवार मँडम यानी उपस्थितांचे आभार मानले.

 
			

 
					 
							 
							