कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट…
(पुणे शहर) प्रतिनिधी. महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग महिला आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी आदरणीय तेजस्विनी सातपुते यांच्या पुण्यातील निवासस्थानी आज रोजी संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी जयहिंद नमस्कार मॅडम असे म्हणत सदिंच्छा भेट घेतली. यावेळी आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या समवेत पुरीगोसावींनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पुरीगोसावी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत स्वागत करीत दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते या 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सातारा सोलापूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. तर पुणे शहरांत डीसीपी म्हणूनही काम पाहिले आहे. ज्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी त्या नेहमीच प्रयत्नशील ठरल्या, तेजस्वीनी सातपुते या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील त्या कन्या आहेत. सध्या त्या पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 या पदावर त्या कार्यरत आहेत. शिस्तप्रिय तसेच डॅशिंग महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. आदरणीय मॅडम जी. यांच्या बद्दल बोलायचे झाले तर शब्द खरंच खूप कमी पडतील, अशा त्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. पुरीगोसावी यांच्या सदिंच्छा भेटीत आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांना सातारा सोलापूर जिल्ह्याची आठवण झाली. यावेळी पुरीगोसावी यांनी सातपुते मॅडम यांचे आभार मानले

