श्री गोवर्धन संस्था वाई येथे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन .
वाई प्रतिनिधी :
वाई दि ८ :– प. पू.गोजीवन चौंडे महाराज आणि आईसाहेब चौंडे यांनी स्थापन केलेल्या गोवर्धन संस्था वाई यांचे वतीने मथुरा पुरी रविवार पेठ गुढीपाडवा मंगळवार दि ९ एप्रिल २४ पासुन सुरू होत आहे . श्रीरामनवमी उत्सव गेली ऐंशी हून अधिक वर्षे हा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे.गुढीपाडवा ते रामनवमी असे दहा दिवस असलेल्या या उत्सवादरम्यान नानाविध सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.यंदाच्या वर्षी सामूहिक रामरक्षा पठण,कु.मधुरा कुलकर्णी,श्री अनिल रामदासी यांची व्याख्याने,श्री अभिजीत केळकर,श्री मंगेश दर्भे,श्री रामचंद्र खोपटीकर, स्नेहश्री गृप वाई यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम, कृष्णाई आणि मुरलीधर भजनी मंडळाचे भजन,आदित्य आणि पूजा चौंडे यांचे काव्यशिल्प,चैत्री हळदी – कुंकू,सौ दया कुलकर्णी यांचे रामजन्माचे कीर्तन आणि डॉ केशव चौंडे यांचा गीत रामायणातील गाण्यांचा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत मथुरापुरी,रविवार पेठ,वाई येथे संपन्न होणार आहे.श्रीरामजन्माचे कीर्तन मंगळवार दि ९ रोजी सकाळी १० वाजता असेल.या उत्सवासाठी सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गोवर्धन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.


