भुईज येथे जेष्ठ नागरिक संघास सपोनि रमेश गर्जे यांनी केले मार्गदर्शन.


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

भुईंजचा जेष्ठ नागरिक संघ हा आदर्श संघ असून त्याचे अनुकरण राज्यभर करण्यासारखे आहे म्हणूनच भुईंज पोलीस स्टेशन व प्रेस क्लब यांच्या सांधिक प्रयत्नातून जेष्ठांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत लोकाभिमुक कार्यक्रम राभवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी केले.

 

भुईज येथे जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेमध्ये जेष्ठांना कायदयाचे ज्ञान देत असताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष जगन्नाथ दगडे, स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती आप्पा बाबर आदी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

यावेळी बोलताना मुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे पुढे म्हणाले की आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धत्व येणे हे जरी क्रमप्राप्त असले तरी जेष्ठांनी आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग गाव समाज व राष्ट्राच्या विकासासाठी कसा होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. भुईजचा संघ नेहमीच तालुक्यात आदर्श आहेच तो यापुढे राज्यभर कगा आदर्श होईल आणि त्याचे अनुकरण इतरांनी करावे यासाठी भुईंज पोलीस व भुईज प्रेस क्लव सांघिक प्रयत्न करणार आहेत असे हि ते म्हणाले.

 

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत ओमप्रकाश उर्फ रमेशआबा भोसले, सदाआण्णा भोसले, अशोक चव्हाण आदींनी केले. आभार जनार्दन खरे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!