भुईंज येथील जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना आ. मकरंद पाटील यांनी दिली भेट.


 

वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण

भुईजच्या मुस्लिम समाजाला सर्वोतोपरी मदत करत जामा मशिदीच्या विकासाला भरीव निधी उपलव्ध केला आहे. तर संरक्षक भिंतीला ५० लाख रूपयांचा निधी लवकर देणार असल्याची ग्वाही हिच रमजान महिन्यातील सुखद आणि समाधान देणारी भेट असेल असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केली.

 

भुईज ता. वाई येथे जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना रमजान सणानिमित्त संवाद साधण्यासाठी आमदार मकरंद आबा पाटील यांनी भेट देत त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी सभापती महादेव म्हसकर, संचालक रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, उपसरपंच शुभम पवार, कृषी भूषण राजूकाका भोसले आदी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

यावेळी बोलताना आ. मकरंद पाटील पुढे म्हणाले की, भुईज येथील जामा मशिदीत वाई तालुक्याच्या पुर्व भागातील सर्व मुस्लिम समाज बांधव नमाजीसाठी येत असतात उपसरपंच शुभम पवार व कार्यकत्यांनी या प्रार्थनास्थळाच्या आडी अडचणी व खचत जात असलेल्या नदी काठावर संरक्षक भिंत असावी अशी मागणी केली होती. याची दखल घेत मी व्यक्तीशः पाठपुरावा करून जामा मशिदीसाठी २० लाख व संरक्षक भिंतीसाठी ३० लाख असा निधी उपलव्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लवकरच त्याचे काम सुरू करणार आहे. असे सांगून हिच खरी रमजान महिण्यातील सुखद आणि समाधान देणारी भेट असे सांगून वाई पाचगणी महाबळेश्वर खंडाळा या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांसाठी कसा व किती निधी आतापर्यंत दिला हे हि मागितले.

 

प्रारंभी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने आमदारांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!