चिरकुट लोकांना मुहतोड जबाव देवू शरद पवार यांची खा. उदयनराजे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शशिकांत शिंदे हे कामगारांचे नेते म्हणून आहेत. त्यांना इतर कोणताही अधिकार नसताना त्यांच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. इंग्रजाच्या काळात सातारकर भिले नव्हते. आता तर या चिरकुटांच्या काळात घाबरणार नाहीत. त्यांना मुहतोड जबाब देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे सांगत शरद पवार यांनी छत्रपती कॉलर उडवतील काय करतील, सकाळी एक.संध्याकाळी एक असतील, आम्ही गादीचा सन्मान करतो परंतु मत देताना गादीला मत देत नाही, अशा शब्दात महायुतीचे उमदेवार खासदार उदयनराजे यांना त्यांनी फटकारले.
वाई येथील भाजी मंडईच्या मैदानात घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, मोदी जाईल त्या ठिकाणी भाषण करतात. नुसती पोकळ आश्वासने देतात. दहा वर्ष सत्ता होती. काय केले त्यांनी महागाई कमी केली का?, इंधनाचे भाव वाढवले, गॅसचे वाढवले. व्यापाऱ्यांची चांदी केली. महागाई कमी करायची असेल तर आमदार शशिकांत शिंदे यांना मतदान करा, आज या देशात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना दवेंद्र फडणवीस जाहीरपणे बोलले दोन पक्ष फोडून मी या ठिकाणी आलो आहे. त्यांनी राजकीय पक्ष फोडले. त्यांनी या देशाचे राजकारण उदध्वसस्त केले ते लोकांना पसंद नाही. हा देश एकसंघ ठेवायचा असोल तर राजकीय पक्ष व्यवस्थित चालले पाहिजेत, असे त्यांनी निक्षून सांगितले. पंडित जवाहरलाल नेहरुंवर सतत भाजपावाले टीका करत असतात. त्यांनी आपलं आयुष्य देशासाठी घालवले. त्याच प्रमाणे स्व. यशवंतराव चव्हाणांचे नाव घेतले जाते. त्यांनी देशाची इज्जत वाढवली. ज्यावेळी चीनने भारतावर हल्ला केला, त्यावेळी या देशाला वाचवण्याचे काम त्यांनी केले. मख्यमंत्री असताना त्यांनी राजीनामा देवून त्यावेळी देशाचे गृहमंत्री म्हणून काम केले, परराष्ट्रमंत्री झाले. ते गांधीवादी विचारांचे होते. आता भाजपावाले त्यांचा फोटो लावत आहेत. त्यांना चव्हाण साहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही. चव्हाण साहेबांनी सामान्य माणसांचे दुख कमी करण्याचे, कष्टकरी जनतेचे, कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. अशा व्यक्तीच्या नावाने भारतरत्न देण्याचे गेल्या दहा वर्षात का सुचल नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. कराडला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्यांनी तेथे स्व. यशवंतराव चव्हाणांच्या भारतरत्नाबाबत जाहीर करुन टाकावे, असे सांगत ते म्हणाले, आज देशात चुकीच्या गोष्टी घडत आहेत. महिलांवर अत्याचार केले जात आहेत. तिकडे पहायला पंतप्रधानांना वेळ नाही. तिकडे पहायला मोदींना वेळ नाही तर मजबूत देश चालवणार कसा, मोदी साहेब मुख्यमंत्री असताना एका भगिनीवर अत्याचार झाला होता. गुन्हेगारांना शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. मात्र त्या गुन्हेगारांची सुटका केली. ते तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतर त्यांचा सत्कारही झाला. महिलांचे अब्रु घेणारे देशाचे हितचिंतक असू शकत नाहीत. भ्रष्टाचाराचे ते सांगतात, परंतु सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत आहेत. सामान्य कुटुंबातले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकले आहे. यासाठी सत्ता आहे का?, हुकूमशाही आहे. लोकशाही नाही. देशाची लोकाशाही धोक्यात येत आहे. त्याची सुरुवात झाली आहे. तुमच्याकडे पंचायत समितीच्या निवडणूका झाल्या का, जिल्हा परिषदेच्या निवडणूका झाल्या का, नगरपालिकेच्या निवडणूका झाल्या का, दोन दोन वर्ष निवडणूका होत नाहीत. याचा अर्थ काय, सगळे आपलेच की, आम्ही म्हणेल तेच धोरण आणि आम्ही म्हणेल तेच राजकारण हे करायच.s हे देशाच्या हिताचे नाही. यांना धडा शिकवायचा आहे. त्यासाठी शशिकांत शिंदेसारख्या कष्टकरी कुटुंबातल्या, घाम गाळणाऱ्या, तुमच्याच भागातला उमेदवार आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठींब्यावर यशस्वी होतील, मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत आहे, त्याच्ंया हातात काही अधिकार नाही. त्याच्यावर खटला भरला आहे. काल पंढरपूरला मी गेलो होतो, अभिजित पाटील यांनी माझी सभा घेतली म्हणून मुंबईला फडणवीस यांनी बोलवून घेतले. त्यांना फडणवीस यांनी तुम्ही आघाडीच्या बरोबर जात असाल तर तुमचा धंदा उद्धवस्त करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या कारखान्यात 20 हजार कामगार, शेतकरी सभासद आहेत. त्या कामगारांचे जीवनमान उध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. इंग्रजाच्या काळात सातारकर घाबरला नाही. असल्या चिरकुट लोकांच्या काळात कोण घाबरणार नाही. मुहतोड जबाब देवू, ती भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आता पाच सहा दिवस काहीही करतील, खोटया नाटया आवया उठवतील, आश्वासने देतील, आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. स्व. यशवंतरावाच्या नंतर किसन वीर आबा, लक्ष्मण तात्या यांच्यासारख्या नेतृत्वांनी दिशा दिली. त्यांच्या आदर्शाचे जतन करुन आदर्श मतांचा विक्रम करुन सातारच्या शशिकांत शिंदे यांना निवडून देवूयात, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार उदयनराजे यांच्यावटी टीप्पणी
बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, छत्रपतींचे कॉलर बिलर उडवणे, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, अशा शब्दात त्यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका करत ते म्हणाले, आम्ही गादीचा सन्मान करतो पण मत देताना गादीला मत देत नाही. मत हे शशिकांत शिंदे यांना असून मताचा विक्रम करुन त्यांना दिल्लीत पाठवू असेही शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांची जोरदार भाषणे झाली. अनेकांना पदे दिली. आभार केदार गायकवाड यांनी मानले.


