पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद! आरोग्य विभागाकडून विशेष सूचना जारी.
प्रतिनिधी : यंदाच्या हंगामामध्ये महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान सर्वाधिक जास्त आहे. त्यापैकी पुणे शहरात गेले काही दिवसा पासून चांगले तापमान वाढले आहे. यंदाच्या हंगामामध्ये पुण्याचे तापमान सर्वाधिक जास्त नोंदवले आहे. या तापमानामुळे पुणेकर सध्या हैराण झाले आहेत. आज पुणे शहरामध्ये सर्वाधिक जास्त ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे .भोर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअस आज होते.तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान खात्याकडून वाढत्या तापमानामुळे विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाने विशेष सूचना जारी केले आहेत .
उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री किंवा टोपीचा वापर करा.
जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरी थोड्या वेळाने पाणी प्या.
ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक,लस्सी, उसाचा रस, फळे किंवा फळांचा रस प्यावा.
हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
दिवसा खिडकी आणि पडदे बंद ठेवावे थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडकी उघड्या कराव्यात.


