सारोळे शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जयश्री सुरेश जगताप यांचा निरोप समारंभ कार्यक्रम साजरा.
मंगेश पवार
सारोळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे या ठिकाणी सोमवार दि.२९/४/२४ रोजी सौ.जयश्री सुरेश जगताप मुख्याध्यापक शाळा सारोळे यांचा सेवापूर्ती समारंभ साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.राजकुमार बामणे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात अगदी सर्वांना समजेल अशा भाषेत शिक्षक कसा असावा हे आपले बहुमूल्य मार्गदर्शन केले. मॅडम विषयी सारोळे शाळेतील वर्ग शिक्षिका अर्चना वानखेडे यांनी आपले छान मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर हिंगे मॅडम यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ जयश्री सुरेश जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी विजयकुमार थोपटे केंद्रप्रमुख सारोळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सावंत यांनी केले.
कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष सुनील लेकावळे जे. के. पाटील, महिला अध्यक्षा बोरगे मॅडम, किकवी शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत गुरव, धनंजय भिलारे, बाळासाहेब गायकवाड, महेंद्र घाडगे, अरुण होडशील, सुरेश जाधव, दीपक चव्हाण,वंदना कोरडे, नम्रता घोगरे, स्वाती तरटे, रत्नप्रभा करवंदे, विद्या बडे, कदम मॅडम, मनीषा गायकवाड इत्यादी उपस्थित होते.


