मतदार दिनी राज्यस्तरीय कार्यक्रमात ; यशवंतराव मोहिते महाविद्यालयाची उपस्थिती 


पुणे : प्रतिनिधी

भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस संपुर्ण  भारतात साजरा केला जातो याच दिनाचे महत्त्व अधोरेखित करत पुणे येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न

झाला. सदरील कार्यक्रम एम.आय.टी. विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

 

यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे दिलीप गावडे, एम.आय.टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस,नव शिक्षण धोरण समितीचे प्रा.डॉ. नितीन करमळकर, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, श्वेता कुलकर्णी, छायाचित्र पत्रकार झोया लोबो, अमुक-तमुक व नागरिकशास्त्र संस्थापक सावनी वझे व ओंकार जाधव युट्युब चॅनलचे संस्थापक, गौरी सावंत हे निवडणूक सदिच्छादूतसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 

लोकशाही बळकट करणा-या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यक्रमात तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करत मतदारांना मतदानाची जाणिव जागृती करण्यासाठी यशवंतराव मोहिते महाविद्यालयातील रा.से.यो कार्यक्रमाधिकारी डाॅ. ज्ञानेश्वर फड, प्रा.सुनील पवार, राष्ट्रीय सेवा रोजना विद्यार्थ्यी प्रतिनिधि संदेश सोनकांबळे यांच्यासह २४ विद्यार्थ्यांची उपस्थित होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!