सोनं स्वस्तात देतो म्हणत १०.५० लाखांची फसवणूक; राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


दि. 7 कापूरहोळ (प्रतिनिधी – पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज)

“३० हजार रुपये प्रति तोळा दराने सोनं देतो,” असा विश्वास देत भोर तालुक्यातील निगडे परिसरात तीन इसमांनी सांगली येथील एका व्यक्तीची तब्बल १० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे.

 

 

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयकुमार बाबासो नरदेकर (वय ४७, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी तक्रार दिली असून त्यांनी सांगितले की, दि. १६ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान, मौजे निगडे गावाच्या हद्दीतील कापुरहोळ-भोर रस्त्याच्या कडेला, कृष्णा प्रकाश तुपे (रा. वडजल, ता. माण, जि. सातारा), राहुल चव्हाण (रा. वराडे, ता. कराड), आणि बुवा ठाकुर (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या तिघांनी संगणमत करून विश्वास संपादन केला.

ADVERTISEMENT

 

ते म्हणाले, “३०,००० रुपये प्रति तोळा दराने सोनं देतो, पैसे घेऊन ये,” असे सांगून फिर्यादी जयकुमार नरदेकर यांना भोर येथे बोलावले. त्यांनी त्यांच्या विश्वासाला बळी पडून रोख १०,५०,०००/- रुपये या तिघांना दिले. मात्र, यानंतर त्यांनी सोनं न देता, पैसे घेऊन फसवणूक केली.

 

 

 

राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नाना मदने  पुढील तपास करीत आहे.

 

 

 

❗ नागरिकांना पोलिसांचे आवाहन या प्रकरणाच्या अनुषंगाने राजगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “स्वस्तात सोनं किंवा इतर मौल्यवान वस्तू मिळत असल्याच्या भूलथापांना बळी पडू नये. कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी खात्री करूनच व्यवहार करावा.” संशयास्पद प्रकार दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

 

अधिक अपडेटसाठी वाचा – “पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज”

तुमचं विश्वासार्ह स्थानिक न्यूज नेटवर्क

सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!