संभाजी ब्रिगड च्या लोणंद शहराध्यक्ष पदी रोहित कोळेकर तर तालुका उपाध्यक्ष पदी दिपक बाटे, सुनील रासकर यांच्या नियुक्ती
संपादक दिलीप वाघमारे
संभाजी ब्रिगड सातारा विभागाच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि जनसामान्यांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी काही नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. या निमित्ताने संघटनेच्या कार्याचा विस्तार अधिक परिणामकारकरित्या साध्य होणार आहे, असा विश्वास जिल्हा अध्यक्ष रफीकभाई शेख यांनी व्यक्त केला.
संभाजी ब्रिगेड चे सातारा जिल्हाध्यक्ष रफीकभाई शेख यांचे हस्ते रोहित कोळेकर यांची लोणंद शहर अध्यक्ष तसेच दीपक बाटे यांची खंडाळा तालुका उपाध्यक्ष व सुनील रासकर यांची सोशल मीडिया उपाध्यक्ष खंडाळा तालुका अशा नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी बोलताना जिल्हा सोशल मीडिया प्रमुख शौकत शेख यांनी सांगितले की,”ही निवड ही केवळ पदांची नाही, तर शिवविचारांची मशाल हाती घेऊन समाज परिवर्तनासाठी सज्ज होण्याची जबाबदारी आहे. हे नवे नेतृत्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, वाहतूक आघाडी जिल्हा अध्यक्ष विकास शेडगे, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शौकत शेख, जिल्हा संघटक महेश गराटे, सचिव महेबूब पठाण, सातारा शहराध्यक्ष अमोल नलावडे, तालुका अध्यक्ष आशिष खवळे, प्रदीप खवळे, नाजीम बागवान, सुजित दगडे, सिद्धेश्वर भरगुडे, इब्राहिम मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.


