कचरा गाडीची यशवंत नगर येथील एकास धडक ; पोलीसात तक्रार दाखल
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
कचरा गाडीची यशवंत नगर येथील एकास धडक या प्रकरणी वाई पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि. ११ रोजी दु. १२ वा. सुमारास यशवंत नगर गावच्या हद्दीत यशवंत नगर ग्रामपंचायत मधील कचरा गोळा करणारे गाडी व चालक विशाल लोखंडे याने त्याच्या ताब्यातील गाडी पाठीमागे घेत असताना दारासिंग घाडगे वय ४० फिर्यादी यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले म्हणून त्या गाडी चालकाच्या विरोधात वाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याचा अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.