जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन चोरी करणारा चोर गजाआड ; ३९,०९,६००/- रु. ऐवज जप्त


 

सातारा प्रतिनीधी : आशिष चव्हाण

 

आक्टोबर २०२३ मध्ये मालगांव ता. सातारा येथे शेतातील घरावर अज्ञात इसमांनी जबरी दरोडा टाकुन वयोवृध्द पती पत्नीस जबर मारहाण केले बाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला होता, सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व. आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडे उघड करणेकरीता वर्ग केला होता व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सपोनि सुधीर पाटील हे

करीत होते. तसेच लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जून २०२४ मध्ये दोन महिलांना जबर मारहाण करुन जबरी चोरी केले बाबत गुन्हा नोंद झाला आहे सदरचा गुन्हा व मालगांव येथील दरोड्याचा गुन्हा पोलीस अभिलेखावरील

आरोपी शेख सुरेश भोसले रा. खामगांव ता. फलटण जि.सातारा याने त्याच्या साथीदारांसह केले असून तो फलटण भागात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली होती त्याप्रमाणे त्यांनी सदर आरोपी यास ताब्यात घेवून कारवाई करणेबाबत सपोनि सुधीर पाटील व त्यांच्या पथकास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे सुधीर पाटील सपोनि व त्यांच्या पथकाने फलटण भागात वेळोवेळी सापळा लावून अहोरात्र

ADVERTISEMENT

संशईत आरोपीवर पाळत ठेवून आरोपी शेख सुरेश भोसले रा. खामगांव ता. फलटण जि.सातारा व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना फलटण भागातून ताब्यात घेतले, व त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्याने तपास करुन त्यांनी सातारा जिल्हयामध्ये जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन एक दरोड, तेवीस जबरी चोरी, एक घरफोडी व एक चोरी असे एकुण २६ गुन्हे केले असल्याचे निष्पन्न करून सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या

सोन्याच्या दागिण्यापैकी ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चालु बाजार भावाप्रमाणे ३९,०९,६००/- किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. तसेच सदर आरोपी यांच्याकडून चोरीचे सोने विक्री करीता घेणार एक इसम निष्पन्न करण्यात आला असून तो फरारी आहे. माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे एकुण ३११ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ७२०.५ तोळे (७ किलो २०५ ग्रॅम) वजनाचे ५,०४,९६,५००/- (पाच कोटी चार लाख शहान्नव हजार पाचशे रुपये ) किंमतीचा

मुद्देमाल हस्तगत केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!