बालचमुंच्या सहभागातून नेत्रदीपक वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन.


 

भोर प्रतिनिधी : सागर खुडे

आज शनिवार दि.१३जुलै २०२४ रोजी अखंड महाराष्ट्राला संत परंपरेचा लाभलेला वैभवशाली धार्मिक वारसा जपण्याहेतू आषाढी एकादशीचे पार्श्वभूमीवर औचित्य साधून अभ्यासपूरक तसेच सहशालेय उपक्रमांतर्गत वागजवाडी येथील सिद्धेश्वरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी शाळा अशा दोन्हीची संलग्न स्वरूपात फुलांनी सुशोभित करून सजवलेल्या पालखीतून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.विठ्ठल पांडुरंगाची रुक्मिणीची आरती करून संपूर्ण वागजवाडी गावांमधून टाळ आणि मृदंगाच्या गजरामध्ये पायी दिंडी काढण्यात आली.यावेळी परिसरातील पालक असंख्य ग्रामस्थ-नागरिक विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाल्याचे दिसून आले. अशा या पायी दिंडीमध्ये चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारत मोठया संख्येने सहभाग नोंदवलेला देखील पाहावयास मिळाला. हा नेत्रदीपक सुखसोहळा पाहता जणू काही साक्षात श्री विठ्ठल,रुक्मिणी अवतरल्याचा भास होत होता. अशा या सुशोभित पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणी यांची आरती करून पायी दिंडीला सुरुवात झाली. वस्ती शाळेपासून ते गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर असा फेरा काढण्यात आला.ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे पूजन केले. सहभागी चिमुकल्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठू नामाचा जागर केल्याने संपूर्ण परिसर भक्तीभावात न्हाऊन निघाला.”विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल” “ज्ञानोबा माऊली तुकाराम”अशा उद्घोषात मुलांची पायी दिंडी ग्रामस्थांच्यां उपस्थितीत पार भक्तिमय हरिनामाच्या जयघोषात पार पडली.त्यामध्ये उत्फुर्तपणें प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी फुगडी खेळण्याचा देखील आनंद लुटला.आणि अशा या पालखीचे सर्व नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले.

ADVERTISEMENT

प्रसंगीच्या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सभासद यांनी अंगणवाडी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कर्मचारी वृंद, शिक्षक_शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुकही केले. त्यानंतर बालचमुंना खाऊ वाटप करण्यात आला.

तसेच वागजवाडी-सिध्देश्वरनगर जिल्हा प्राथमिक प्रभारी मुख्याध्यापिका सौ.ज्योती पापळ (बढे) सहाय्यक शिक्षिका सौ.सुनंदा काकडे आणि अंगणवाडी सेविका सौ.मंजुषा काळे तसेच सहाय्यक कर्मचारी यांनी उपस्थित पदाधिकारी,पालक, आणि भजनी मंडळाचे सदस्य, तसेच ग्रामस्थांचे देखील आभार मानले.

या प्रसंगीच्य कार्यक्रमासाठी पालकांसह, वागजवाडी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाहायला मिळाले.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!