न्हावी येथील शाळेत बालचमुचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.
सारोळे : महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला – म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात.
पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात. हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थिनींनी मधे रुजविण्यासाठी

जि.प.प्राथ.शाळा न्हावी शाळेचा पालखी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला.
सर्व मुले संत,वारकरी संप्रदाय पोशाख करून भक्तिमय वातावरणात सोहळ्यात सहभागी झाली.टाळ गजरात विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन बाळगोपाल रिंगण धरून फुगड्या खेळत होते.यावेळी २ री, ३ री, ४ थीच्या मुलांनी विठ्ठल भक्तीवर नृत्य सादर केले. यावेळी ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक केले,मुलांना खाऊ दिला.
पालखी सोहळा पार पडल्यानंतर मा. नवनाथ सोनवणे, चेअरमन वि.का.से.सो.न्हावी यांचेकडून मोतीचूर लाडू व सांबर,भात असे महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी,सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शाळा न्हावी, ग्रामस्थ,पालक,महिला, युवक,शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात उपस्थित होते.

यावेळी संदिप मोरे,अनिल चाचर,श्रीम.रुपाली पिसाळ(चाचर),सौ.पूनम सोनवणे,सौ.सोनाली बोन्द्रे यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन केले.


