कर्मवीर जयंती निमित्त ३० सप्टेंबर रोजी समारंभाचे आयोजन


 

उपसंपादक :दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

लोणंद- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती निमित्त लोणंद येथील रयत संकुल लोणंदच्या वतीने सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज (मुलींचे) लोणंद येथील प्रांगणात आयोजित केला आहे. या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत, इतिहास अभ्यासक व लेखक मा. डॉ. श्रीमंत कोकाटे व भारतीय क्रिकेट नियमक मंडळ उपसंचालक, सहाय्यक पोलीस उपायुक्त ( से. नि. ) मा. रवींद्र डोईफोडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था, सातारा सहसचिव (उ.शि.), मा. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ,मा. सभापती, समाजकल्याण जि.प.सातारा मा. आनंदराव शेळके-पाटील,जनरल बॉडी सदस्य, र.शि.सं. सातारा व आजीव सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मा. मिलिंद माने, ज्येष्ठ नेत्र चिकित्सक, लोणंद मा. डॉ. अजित वर्धमाने, प्रसिद्ध बालरोग तज्ञ अनिल राजे निंबाळकर, भागीदारी संस्था (से. नि.) निबंधक मा. ॲड. सुरेंद्र बोडरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. यावेळीन्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज, (मुलींचे) लोणंद प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे,प्राचार्य मालोजीराजे विद्यालय व ज्युनि. कॉलेज, लोणंद व सदस्य समन्वय समिती, र.शि.सं. सातारा श्री. चंद्रकांत जाधव उपस्थित असणार आहेत. सर्व विद्यालय व महाविद्यालय विकास समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवर्ग, विद्यार्थी व विद्यार्थिनी, रयत संकुल, लोणंद आणि लोणंद पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हितचिंतक यांनी या जयंती सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. प्राचार्य शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!