उन्हाळी अवकाळी पावसाने खेड बुद्रुक मधील घराचे नुकसान झाल्या प्रकरणी शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नसल्याने खंत
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
खेड बुद्रुक मधील रासकर वस्ती तील साहेबराव वाघमारे यांचे दोन खोल्याचा पत्रा झापड उडून फार मोठे नुकसान झाले होते त्यावेळी ग्रामसेवक तलाठी यांना संपर्क साधून पंचनामा ग्रामस्थांच्या समवेत झाला होता त्या कुटुंबांना अद्याप शासनाकडून नुकसान भरपाई न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मागासवर्गीय कुटुंबाची परवड कोण थांबवणार नुकसान भरपाई द्यायची नव्हती तर शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामाचे नाटक तमाशा का करायचा असा सवाल उपस्थित होत आहे शासनाने आगामी काळात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्काळ निधी न दिल्यास मतदानावरती बहिष्कार घालण्यात येणार आहे शासनाने फेरविचार करून मागासवर्गीय कुटुंबांना आधार देणे काळाची गरज आहे याचे शासन विचार करेल काय असा प्रश्न वाघमारे कुटुंबांनी केला आहे

 
			

 
					 
							 
							