गुरुकुल मार्शल आर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी आयोजित आशा किरण सोशल फाउंडेशन अंतर्गत मुलींसाठी तीन महिने मोफत प्रशिक्षण 


 

दि. 26 सारोळे : महिला व मुलींवरचे होणारे अत्याचार रोखण्यासाठी स्वसंरक्षण करणे ही काळाची गरज आहे त्यामध्ये आपल्याला कराटे किक बॉक्सिंग तायक्वांदो सेल्फ डिफेन्स शस्त्रविद्या तलवारबाजी दानपट्टा लाठीकाठी भाला चालवणे या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

मुलींनो अजून वेळ गेली नाही वेळीच जागे व्हा स्वतः संरक्षण करण्यासाठी शस्त्रकाला कराटे तायक्वांदो लाठीकाठीचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतो एवढे तरी सक्षम व्हा.

ADVERTISEMENT

 

घरातही मुलींना या गोष्टी आवर्जून सांगा वेळ वाईट आहे स्वतःचे संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष द्या ज्यांना ज्यांना लहान मुली आहेत त्यांनी या वयापासूनच त्यांच्या मनगटात रग निर्माण करा, मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत तीस वर्षाच्या माणसाला लोळवेल इतका प्रचंड आत्मविश्वास त्याच्यामध्ये उत्पन्न करा, मुलींना ताकतीची जाणीव करून द्या नाजूक बिजू हे असले प्रकार सोडून द्या, डोळ्यात आग दिसली पाहिजे.

 

भीती वाटते असे सतत म्हणण्यापेक्षा मुलींना समाजात भिडायचं कसं ते शिकवा असे गुरुकुल अकॅडमीचे ग्रँड मास्टर किरण साळेकर यांनी आपले मत मांडले.

 

तुमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय

आजच आपला प्रवेश निश्चित करा

पत्ता गुरुकुल अकॅडमी श्रीराम कॅफे समोर वीर रोड सारोळा

 

 ऍडमिशन साठी संपर्क  किरण साळेकर सर (मार्गदर्शक व क्रीडा प्रशिक्षक) मो.नं. 9767358353


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!