शिव फुले,शाहू,आंबेडकर विचारांच्या एकतेतून भोरमध्ये काँग्रेस–वंचित आघाडी
मंगेश पवार
भोर:- तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात निवडणूक आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय लोकशाही, शिव–फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारधारेशी एकमत असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र येत विजयाच्या निर्धाराने निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेस भोर तालुका अध्यक्ष सतीश चव्हाण, पुणे जिल्हा युवा काँग्रेस प्रवक्ता सचिन खोपडे व शैलेश जाधव उपस्थित होते.
भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गणाचे उमेदवार वैभव धाडवे पाटील, पंचायत समिती नसरापूर गटाचे उमेदवार विजय शिळीमकर यांचीही उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष संतोष लोखंडे, उपाध्यक्ष सुनील कांबळे, महासचिव अरुण कांबळे, उपाध्यक्ष मयूर गायकवाड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही आघाडी भोर तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


