राबोडी पोलिसांकडून चोरीस आणि गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत, नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार,
संभाजी पुरीगोसावी ( ठाणे शहर ) प्रतिनिधी.राबोडी पोलीस ठाणेच्या परिसरांत व हद्दीमध्ये हरवलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळवण्याची शाश्वंती कमी असताना व मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल याची खात्री नसते, तरीही नागरिक पोलिसांकडे तक्रार दाखल करतात मोबाईल हरवल्यापेक्षा त्यामधील डेटा आणि इतर माहितीमुळे नागरिक चांगलेच हैराण होत असतात. त्याचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असते,राबोडी पोलिसांनी मोठी कामगिरी करीत नागरिकांचे गहाळ आणि हरवलेले मोबाईल जवळपास 40 मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवले आहे संबंधित नागरिकांना हे मोबाईल पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ चे शशिकांत बोराटे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया देविदास डमाळे यांच्याहस्ते परत करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत, अखेर राबोडी पोलिसांनी एकूण 4.10. किंमतीचे एकुण 40 मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, संबंधित नागरिकांना हे मोबाईल परत करण्यात आल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात आली, सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मन चंद्रकांत पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक कृष्णा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार यशोदा घोडे पोलीस हवालदार सशांक सावंत पोलीस नाईक समाधान माळी यांच्या पथकांने ही कामगिरी केली आहे.

