चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण 60 मोबाईल 12 लाख रुपयांच्या मोबाईलचा शोध, वाई पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी,


 

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. वाई पोलीस ठाणेच्या हद्दीमधील हरवलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळवण्याची शाश्वंती कमी असताना व मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल याची खात्री नसते, तरीही नागरिक पोलिसांकडे तक्रार दाखल करतात मोबाईल हरवल्यापेक्षा त्यामधील डेटा आणि इतर माहितीमुळे नागरिक चांगलेच हैराण होत असतात. त्याचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असते, नागरिकांच्या मोबाईलच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता वाई पोलीस ठाणेच्या हद्दीमधील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण लक्षात घेवुन परी.पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेत योग्य ते मार्गदर्शन करून सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणे बाबत सूचना केल्या होत्या, त्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करिता महाराष्ट्र तसेच विविध राज्यांतून वाई पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने अखेर एकूण 60 मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, संबंधित नागरिकांना हे मोबाईल परत करण्यात आल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात आली, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली परि.पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर प्रभारी अधिकारी स.पो.नि. अमोल गवळी तपास पथकांचे प्रमुख सुधीर वाळुंज सुधीर पो.हवा.अजित जाधव पो.कॉ. विशाल शिंदे पो.कॉ. राम कोळी हेमंत शिंदे मंगेश जाधव म.पो कॉ. ज्ञानेश्वरी भोसले महेश पवार (सायबर) आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला, त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!