करंजखोप मध्ये शिवमुद्रा मित्र मंडळाच्या नवदुर्गा मातेच्या आरतीचे मानकरी, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने शिवमुद्रा मंडळाकडून पोलीस निरीक्षकांचे स्वागत,
संभाजी पुरीगोसावी : सातारा जिल्हा प्रतिनिधी.
उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप येथील शिवमुद्रा मित्र मंडळ शारदीय नवरात्र उत्सव (वर्ष 11 वे ) शिवमुद्रा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीच धार्मिंक पारंपारिक संस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असते, आज सायंकाळच्या पाचव्या दिवसांच्या आरतीचे मानकरी वाठार पोलीस ठाणेचे विद्यमान प्रभारी अधिकारी श्री. अविनाश माने यांना शिवमुद्रा मित्र मंडळाच्या वतीने आरतीचा मान देण्यात आला. यावेळी स.पो.नि. अविनाश माने यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि उपस्थित भक्तांना थोडक्यांत मार्गदर्शन केले, त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव तसेच विविध पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्त आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यमान प्रभारी अधिकारी श्री. अविनाश माने आणि त्यांच्यासमवेत आलेले पोलीस कर्मचारी यांचेही शाल,श्रीफळ देवुन स्वागत करण्यात आले, मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे प्रभारी अधिकारी यांनी विशेष कौतुक केले, यावेळी सण उत्सव मोठ्या उत्साहांत साजरे करा, पण पोलीस प्रशासनाला आपलेही सहकार्य तसेच सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन स.पो.नि. अविनाश माने यांनी थोडक्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला. शिवमुद्रा मित्र मंडळ शारदीय नवरात्र उत्सवांत राजकीय सामाजिक धार्मिंक शैक्षणिक पोलीस महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना मंडळाच्या वतीने विनंती करून आरतीचा मान शिवमुद्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत असतो, हिंदू-धर्मात अनेक सण उत्सव साजरे केले जातात, प्रत्येक सणाला खूप महत्त्व असते असाच हिंदू धर्मातील सगळ्यांत मोठा शारदीय नवरात्री या सणाला 3 ऑक्टोंबर पासून प्रारंभ झाला आहे, या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. जवळपास प्रत्येक घरांमध्ये हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहांत साजरा केला जातो, असे म्हणतात की या नऊ दिवसांमध्ये माता ही पृथ्वीवर उतरलेली असते आणि सगळ्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते,