भोर येथे बदली झालेले,व नवीन आलेले तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचा निरोप व स्वागत समारंभ संपन्न.


 

भोर : निरोप समारंभ हा दिवस प्रत्येक अधिकाऱ्यांचा भावनिक क्षण असतो.हा दिवस सदैव आठवणीत राहावा असा प्रसंग भोर तालुक्यात घडला आहे.भोर तालुक्यातील तहसीलदार सचिन पाटील व उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे या दोन अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ ९ ऑगस्ट २०२४ भोर पंचायत समिती सभागृहात पार पडला.

 

प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष अजय कांबळे,व प्रख्यात निवेदकांचा बादशाह,पत्रकार विठ्ठल पवार सर यांनी यावेळी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

तहसीलदार सचिन पाटील यांची भोर येथून इगतपुरी येथे बदली झाली. तर राजेंद्र कचरे यांची भोर येथून सातारा जिल्ह्यातील वाई येथे बदली झाली.

ADVERTISEMENT

भोर तालुक्यात “राम लक्ष्मणाच्या” जोडीने काम करून तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावले. तसेच पानंदरस्ते नागरिकांना खुले करून दिले. प्रशासनात पारदर्शक कारभारामुळे जनतेच्या मनात चांगले स्थान निर्माण केले. राज्य शासनाचे विविध कार्यक्रम योजना तालुक्यात या” राम लक्ष्मणाच्या “जोडीने यशस्वीपणे राबविले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका बजावली. तसेच महसूल खात्यातील काम चुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले. अशा अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ पार पडताना उपस्थित आमचे डोळे पाणावले आणि कार्यालयात भावनिक वातावरण तयार झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!