उमाजी नाईक तरुण नवरात्रोत्सव निमित्ताने राजापुर ग्रामस्थांच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा
सारोळे : राजापुर गावात नवरात्र निमित्त ग्रामस्थ महिला मंडळींनी पैठणीचा खेळाचे आयोजन करण्यात आले होते.राजापूर गावचे उपसरपंच सुधाकर गुडगुडे यांनी तसेच हर्षद बोबडे, शिवाजी गुडगुडे,संजय गुडगुडे, सुलतान मदने.अक्षय भंडलकर, दत्तात्रय गुडगुडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
एकुणा चार फेऱ्या घेण्यात आल्या.त्यातील तीन फेऱ्यांना बक्षीस पहिल्या आणि दुसऱ्या नंबर साठी पैठणी साड्या वाटप करण्यात आले.

एकुण ती पैठण्या वाटप करण्यात आले.राजापुर गावातील 150 ते 200 महिला सहभागी झाल्या होत्या.लहान मुले, मुली तसेच युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला मंडळाचा उस्फूर्त प्रतिसाद यावेळी लाभला.
प्रथम क्रमांक राजापुरची कन्या भोंगवली गावची सुन अक्षदा साळुंके(बोबडे)
द्वितीय क्रमांक सोनाली बोंडरे, तृतीय क्रमांक सुनिता खोमणे यांनी पटकाविले.
लहान मुलांनसाठी चमचा लिंबू,खेळ ठेवण्यात आला.महिलांसाठी संगीत खुर्ची, त्यातून तीन नंबर काढण्यात आले.तळ्यात मळ्यात अशा. पद्धतीने संगीत खुर्ची साठी महिला निवडल्या जात होत्या.दुसरी स्पर्धा फुगा फुगवून तो बसून फुगवणे.ह्या साठी आयोजित करण्यात आले.त्यातून पहिला आणि दुसरा नंबर काढण्यात आले.तिसरी स्पर्धा मध्यभागी बाॅल ठेवणे.आणि काठी भोवती 10 वेढे मारणे आणि बाॅल बादलीत नेऊन टाकणे.अशा पद्धतीने पैठणी जिंकलेल्या महिलांचे विशेषतः कौतुक करण्यात आले.
ह्या स्पर्धा चे सादरीकरण ( सुत्रसंचलन) हर्षद बोबडे सर यांनी केले.


