आंबेगाव तालुक्यातील शालेय विद्यार्थिंनीचा विनयभंग प्रकरणातील अखेर आरोपी शिक्षक अटक, घोडेगांव पोलिसांचे जनतेतून कौतुक,
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा)
शाळेतील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय पुण्यातील घोडेगांव मध्ये तर थेट शिक्षकानेचं अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करीत विनयभंग केला, याप्रकरणी पोस्कोंचा गुन्हा घोडेगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला, त्यानंतर हा शिक्षक फरार झाला होता मात्र घोडेगांव पोलीस ठाणेचे स.पो.नि. किरण भालेकर आपल्या पोलीस ठाणेकडील पोलीस पथकासमवेत आरोपी शिक्षकांच्या शोधात होते, आंबेगाव तालुक्यांत अठरा वर्षाखालील मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फरार क्रीडा शिक्षक याला अखेर घोडेगांव पोलिसांनी शिंताफीने तपास करून त्यास ताब्यांत घेवुन अटक केली आहे, त्याच्यावर पोस्कों अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी क्रीडा शिक्षक हा खेळाडू मुलीला क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्याचे आमिष दाखवून जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करीत होता. या त्रासांला कंटाळून पिडीतने अखेर कॉलेजमध्ये जाणे बंद केले होते, मुलगी तणावात असल्यांने घरच्यांनी विचारपूस केली असता, यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी शिक्षण संस्थेकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना समजला यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना बोलवून घेत या गंभीर प्रकारांची तक्रार दाखल करून घेतली, दरम्यानच्या काळात फरार आरोपी शिक्षक तीन ते चार दिवसांपासून घोडेगांव पोलिसांना चांगलाच गुंगारा देत होता, मात्र पोलीस त्याच्या शोधात होते, या कालावधीत नागरिकांनीही जाहीर निषेध व्यक्त करीत पोलीस ठाण्यावर काळी फित बांधून मूक मोर्चा काढला होता. मात्र घोडेगांव पोलिसांनी अखेर विनयभंग प्रकरणातील फरार आरोपी शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.


