गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची पदोन्नतीने पुण्यात बदली.
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी
हिंगोली जिल्ह्यात पोलीस दलाचा दबदबा राखणारे आणि गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची नुकतीच पुणे शहर पोलीस दलात पदोन्नतीने पोलीस उप आयुक्त म्हणून बदली झाली आहे, बुधवारी रात्री उशिरा राज्यांतील जवळपास 12 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांनी अल्पावधित आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता, दर महिन्यात चोरी, जबरी चोरीचे गुन्हे उघड झाल्यानंतर त्यातील जप्त केलेला मुद्देमाल दर महिन्यांच्या अखेरच्या दिवशी पोलीस ठाण्यात बोलवून सन्मानपुर्वक परत करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला होता, दोन वर्षाच्या आपल्या कार्यकाळात जवळपास ४ कोटी रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला, यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम दुचाकी चार चाकी वाहनांचा समावेश होता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीट मार्शल मार्फत गस्त सुरू केली होती, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना गस्तीवर राहण्याचे आदेश त्यांनी दिले होते, त्यामुळेच जबरी चोरी एटीएम पळविण्याची घटना वेळीच रोखण्यात पोलीस दलास यश मिळाले आहे, अवैध व्यवसायिकांवर त्यांनी चांगलाच अंकुश ठेवला होता, मटका,जुगार अवैध्य दारू विक्रीवर त्यांच्या काळात कडक कारवाया करण्यात आल्या होत्या, या शिवाय पोलीस दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेलमध्ये एका वर्षात तब्बल ३६० जोडप्यांचे समुपदेशन करून विभक्त होणारा संसार पुन्हा जुळविला आहे, पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले तर वृक्षारोपनासाठी ही त्यांनी चांगलाच पुढाकार घेतला होता, जी. श्रीधर हे मूळचे तामिळनाडू राज्यांतील गोविंदराजन श्रीधर हे तरुण,तडफदार मनमिळावू आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात हातखंडा असलेले आणि शिस्तप्रिय तसेच गुन्हेगारीचा कर्दनकाळ महाराष्ट्र पोलीस दलात ओळखले जाते, त्यांनी आत्तापर्यंत नागपूर बीड अकोला औरंगाबाद ग्रामीण आणि हिंगोली अशा विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे,त्यांच्या बदलीनंतर आता अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम यांच्याकडे तात्पुरता स्वरूपात पोलीस अधीक्षक पदाचा पदभार देण्यात येणार आहे,