सोसायट्यांनी नवनवीन उपक्रम राबवावेत ; आ. शिवेंद्रराजे भोसले


 

सातारा  प्रतिनिधी: बजरंग चौधरी

 

जावली तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांनी शेतकऱ्यांना केवळ कर्जपुरवठा न करता संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी नवनवीन उपक्रम राबववावेत. केळघर विकास सेवा सोसायटीने सुरू केलेल्या भारतीय जन औषधी केंद्राचा फायदा सोसायटीच्या सभासदांसह सर्वसामान्यांनाही निश्चित होईल. यापुढील काळातही जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

केळघर विकास सेवा सोसायटीच्या जनऔषधी केंद्र उद्घाटनप्रसंगी व सोसायटीच्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, सहायक निबंधक नानासाहेब रुपनवर, जिल्हा बँकेचे विकास आधिकारी राजेंद्र निकम, सोसायटीचे अध्यक्ष सुनील जांभळे, उपाध्यक्ष तुकाराम पार्टे, विक्री आधिकारी संजय निकम, अरुण खटावकर, संचालक रामभाऊ शेलार हरिभाऊ शेलार, एम. एस. पार्टे, जगन्नाथ शेलार, संपत सुर्वे , अंकुश बेळोशे , बबन बेलोशे, मोहन कासुर्डे , नारायण पार्टे , शशिकांत शेलार ।, अरविंद शेलार, केळघर परिसरातील सरपंच , उपसरपंच पदअधिकारी आदींची उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

 

[ *जावलीचा स्वाभिमान नक्की कुणी दुखावला – आ. भोसले*

आ. भोसले म्हणाले, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने विरोधक जावलीच्या जनतेशी जवळीक साधत आहेत. जावलीचा स्वाभिमान म्हणून काही जणांकडून जनतेचा बुद्धिभेद केला जात आहे. मात्र जावलीचा स्वाभिमान नक्की कुणी दुखावला याबाबतचे स्पष्टीकरण विरोधकांनी द्यावे. ]

 

रांजणे म्हणाले, जन औषधी केंद्रमुळे सभासदांना अल्प दरात औषधे उपलब्ध होणार आहेत

सभासदांनी लाभ घ्यावा. जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला २४ तास उपलब्ध असणारे व विकासकामांमुळे जावलीच्या जनतेशी आ. भोसले यांची नाळ जोडलेली आहे. जिल्हा उपनिबंधक सुद्रीक म्हणाले, केळघर सोसायटीने सुरू केलेले जन औषधी केंद्र हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले जन औषधी केंद्र असून विकास सोसायट्यांनि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

सुनील जांभळे यांनी अहवाल वाचन केले. आनंदा शेलार यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!