दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींच्या कोरेगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या
संभाजी पुरीगोसावी
कोरेगांव पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांच्या ग्रामीण भागात दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींच्या पोलीसांनी शिताफीने शुक्रवारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, कोरेगांव तालुक्यांतील एकसळ म्हसवड आणि झरे (ता. आटपाडी) येथून दुचाकी चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी दिली आहे, ( सुहास वाघमारे, यश कुंभार व अमोल वाघमारे तिघे रा. झरे ता. आटपाडी जि. सागली ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, कोरेगांव पोलीस पेट्रोलिंग करीत असताना संशयित युवक हे विनाक्रमांकांच्या दुचाकीवरून जात असल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रथमता उडवाउडवीची उत्तरे दिली अधिक संशय बाळगल्याने त्यांना दुचाकीसह पोलीस ठाण्यात आणले, यावेळी त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली त्यांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रशांत होले पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पो.हवा. विलास ढमाळ ज्ञानेश्वर साबळे राहुल कांबळे अमोल धनावडे समाधान शेडगे प्रमोद जाधव अक्षय शिंदे गणेश शेळके आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, कोरेगांव पोलिस ठाणे यांच्या सदर कारवाईबदल वरिष्ठांकडून अभिनंदन होत आहे.

			
