पुणे सातारा महामार्गावरती कांबरे गावच्या हद्दीत दुचाकीस चार चाकी वाहनाची धडक.
नसरापूर : प्रतिनिधी
पुणे सातारा महामार्गावरती सतत छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यातच दि.१० रविवारी सुट्टीच्या दिवशी
दुचाकीस चार चाकीची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १०रोजी स ०९.००वा चे सुमारास मौजे कांबरे गावचे हददीत कांबरे ते देगाव रोडवर खुटवड वस्ती रोडवर जयसिंग जाधव फिर्यादी यांचा मुलगा अमित जाधव वय १८ वर्षे रा. वागजवाडी हा त्याचे ताब्यातील पल्सर मो सा नं MH 14 FJ-0603ही वरून नसरापुर कांबरे खेबा रोडने कांबरे खेबा बाजुकडे जात असताना समोरून चारचाकी गाडी नं MH14 KS 9447 ही वरील चालक नाव पत्ता माहीत नाही याने अमित यास समोरून धडक देवुन अपघात करून अपघतात अमित यास डोकीस, उजवे हातास, डोळ्यास, डावे पायास किकोळ व गंभीर दुखापतीस व मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता निघुन गेला म्हणुन जयसिंग जाधव यांनी त्याचे विरूध्द राजगड पोलिस स्टेशन मध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास स फौ ढावरे करत आहेत.


