घरफोडी करणा-या चोरटयास २४ तासाचे आत लोणंद पोलीसांनी केले जेरबंद.


 

खंडाळा प्रतिनिधी : लोणंद पोलीस ठाणे हददीतील लोणंद ता. खंडाळा गावचे हद्दीत बाळासाहेब नगर येथे सोन्याचे मंगलसुत्र व रोख रक्कमेची घरफोडी झालेचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हयाचे तपासात वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षकगुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपीस निष्पन्न केले.

ADVERTISEMENT

दि. १२/०४/२०२४ रोजी आरोपीचा ठावठिकाण्याबाबत माहीती घेवुन मा. वरीष्ठ अधिकारी सो. यांचे मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील आरोपीसं गुनहा घडलेपासुन २४ तासाचे आत ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्यांने लोणंद हद्दीतील बाळासाहेबनगर येथील घरफोडी केलेची कबुली दिली असुन चोरी केलेले ५०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे एक तोळा वजनाचे मणीमंगळसुत्र व रोख रक्कम १६५००/- रुपये असे आरोपीकडुन हस्तगत करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, विठ्ठल काळे, सर्जेराव सुळ, केतन लाळगे, शेखर शिंगाडे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन सपोफौ. देवेंद्र पाडवी, हे पुढील तपास करीत आहेत.

1) प्रसाद दिलीप खोमणे वय २० वर्षे रा. बाळासाहेबनगर लोणंद ता. खंडाळा जि. सातारा याला अटक केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!