तडीपार आरोपीवर लोणंद पोलीसांची कारवाई.
खंडाळा प्रतिनिधी : टोळीप्रमुख किरण रमेश आवारे रा. बिबी ता. फलटण जि. सातारा यास सातारा जिल्हा व पुणे जिल्हा येथुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे दि.२७/२/२४ रोजी हददपार करण्यात आला होता. परंतु आज दिनांक १४/५/२४ रोजी तो त्याचे घरातील लोकांना बिबी गावात भेटण्यास आल्याची माहीती सपोनि सुशिल भोसले यांना मिळाल्याने त्यांनी पोहवा सर्जेराव सुळ व पोना सिदधेश्वर वाघमोडे यांना किरण आवारे हा घरी आला आहे काय याची खात्री करणेकामी त्याचे घरी बिबी येथे पाठविले असता तो घरी मिळुन आला आहे. सदर इसम हा कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची सातारा जिल्हयात येण्यापुर्वी परवानगी न घेता सातारा जिल्हयात प्रवेश केलेला मिळुन आला आहे. त्याचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहवा चंद्रकांत काकडे करीत आहेत.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सर्जेराव दिनकर सुळ, सिध्देश्वर तात्याबा वाघमोडे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.