पार्किंग वाहनातून ५ लाखांचे दागिने लंपास
[
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे दोन दिवसांपूर्वी वेण्णा लेक रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनातून सुमारे ५ लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध दाखल झाला आहे. याबाबत शिवाजी गणपत रावत, रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे यांनी महाबळेश्वर पोलिसात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वेण्णा लेक रस्त्यालगत आपले वाहन पार्क करून कुटुंबीयांसमवेत फिरण्यासाठी गेलो होतो. तेथून परतल्यावर वाहनात ठेवलेले ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे समजले. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार व हवालदार संतोष शेलार करत आहेत.