भोर तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाची हजेरी; लग्नसराईत वऱ्हाडांची तारांबळ


भोर : सध्या तालुक्यात लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असतानाच आज भोर तालुक्याच्या पूर्व भागात अचानक पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर वातावरणात बदल होत ढग दाटून आले आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे लग्न समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडांची तसेच मंडप उभारणी करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

ADVERTISEMENT

अनेक गावांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित करण्यात आले असून अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी मंडप आणि सजावटीची धावपळ सुरू झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी लग्न समारंभांमध्ये मात्र पावसामुळे गैरसोय झाल्याचे चित्र दिसून आले.

हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये वातावरण बदलासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!