नसरापूर प्रकरणात आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना निवेदन
भोर प्रतिनिधी :- भोर तालुक्यातील मौजे नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेप्रकरणी आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह येथे निवेदन देण्यात आले.
तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून खून केल्याच्या अमानुष घटनेबाबत संताप व्यक्त करत, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात (Fast Track Court) घेऊन पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा.
सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
पीडित मुलीच्या आईला शासकीय नोकरीत सामावून घेऊन आर्थिक मदत द्यावी.
यावेळी मा आमदार संग्राम थोपटे, आमदार राहुलजी कुल, पुणे जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके, नसरापूर गावच्या सरपंच उषा कदम, उपसरपंच इरफान मुलाणी, मा उपसरपंच गणेश दळवी, सुधीर वाल्हेकर, बाजार समितीचे मा संचालक ज्ञानेश्वर झोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य हाडके, श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष उदय अलोटे, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा स्मिता विभुते, तनिष्का भोर तालुका अध्यक्षा वैशाली झोरे, निवृत्त DYSP यशवंत कदम तसेच रमेश कदम, अतुल चाळेकर, संकेत हाडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


