अंध ध्वज निधी संकलनात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गौरव


सारोळे :-  किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे दि 19 रोजी शालेय विद्यार्थी व शिक्षकांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (NAB) युनिट महाराष्ट्र यांच्या अंध ध्वज निधी 2025-26 उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण रु. 24,515/- निधी संकलित केला. हा निधी दृष्टीबाधित बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक व पुनर्वसन कार्यासाठी आर्थिक मदत म्हणून प्रदान करण्यात आला.

या उपक्रमात सर्वाधिक निधी संकलन केल्याबद्दल रुद्र सुनील पोखरकर याने प्रथम क्रमांक, यशराज भरनामा नाईक याने द्वितीय क्रमांक तर कु. तन्वी तुळशीराम तनपुरे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या इतर सुमारे 100 विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही विशेष गौरव करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनोद दशरथ राऊत यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी गावात फिरून ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या निधी संकलनाच्या कार्याचे मुख्याध्यापकांनी विशेष कौतुक केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी केलेले हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!