मामुर्डी शाळेत शाळाप्रवेशोत्सव संपन्न


 

प्रतिनिधी : बजरंग चौधरी

 

मामुर्डी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात शाळा प्रवेशोत्सवाने करण्यात आली.सकाळी गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली.नवीन दाखल विद्यार्थ्यांना सजवलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीतून मिरवणूक काढुन वाजत गाजत शाळेत आणण्यात आले.शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची गुडी उभारली.नवीन दाखल विद्यार्थांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले.पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी नवीन हजर झालेल्या मुख्याध्यापिका शशिकला दळवी यांचेही स्वागत करण्यात आले.माजी सह आयुक्त विष्णू धनावडे यांनी मुलांना गोड खाऊ वाटला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे यांनी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन दिले.या कार्यक्रमाला

ADVERTISEMENT

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी,माजी सह आयुक्त विष्णू धनावडे,जावली बॅंकेचे संचालक विश्वनाथ धनावडे, भिलारे सर शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला दळवी, धोंडीबा मोरे, तुकाराम शेलार,शिल्पा कारंजकर ,पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!