महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे आणी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
भोर : महाविकास आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाकडून भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यांचा २४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी प्रचाराच्या पुढील नियोजनाबद्दल व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते श्री. सचिनभाऊ अहिर यांनी मार्गदर्शन करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून यासाठी मातोश्री वरून आलेल्या आदेशाचे पालन करत सर्वांनी एकदिलाने काम करावे व आमदार संग्रामदादा थोपटे यांचा विजय तर निश्चित आहे या निमित्ताने महाविकास आघाडीचे भक्कम असून जास्तीत जास्त मतांनी आमदार संग्रामदादा थोपटे होतील त्यांच्या माध्यमातून एक मोठी संधी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उपनेते सचिन अहिर, उमेदवार आमदार संग्राम थोपटे, सोपान मोहोळ, संग्राम मोहोळ, बाळासाहेब थोपटे, मानसिंग धुमाळ, महेश टापरे, सविताताई दगडे, महादेव कोढरे, संतोष रेणुसे, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, नानासो राऊत, शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, दिनकर धरपाळे, अमोल नलावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



