पाटण तालुक्यातील पाबळवाडी गावचे माजी उपसरपंच व बंधू-भगिनींचा मा. ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.
पाटण प्रतिनिधी : शंकर माने
पाटणमधील मौजे पाबळवाडी गावचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शनिवार दि. २२ जून रोजी पालकमंत्री मा. शंभूराज देसाई दौलतनगर येथे भेट घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला. यात माजी उपसरपंच संपत कृष्णात सूर्यवंशी, मा. ग्रा.सदस्य कृष्णात यशवंत सूर्यवंशी, राजन बबन पाबळे, मा. ग्रा.सदस्य दत्तात्रय प्रभाकर सूर्यवंशी, कोंडीबा जगन्नाथ सूर्यवंशी, हंबीराव कोंडीबा पाबळे,यशवंत कोंडीबा सूर्यवंशी, अमृत तानाजी सूर्यवंशी, प्रकाश ज्ञानू सूर्यवंशी,हणमंत ज्ञानू सूर्यवंशी,सर्जेराव बबन पाबळे, कांताबाई हणमंत सूर्यवंशी, बाळाबाई अण्णा सूर्यवंशी, लक्ष्मी गोपाळ सूर्यवंशी, मा. ग्रा.सदस्य धनश्री कृष्णत सूर्यवंशी, बाळाबाई कृष्णत सूर्यवंशी, नंदा सर्जेराव सूर्यवंशी आदी बंधू-भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना पक्षात आज जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने पाबळवाडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे.
यावेळी मा. शंभूराज देसाई आणि मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई यांनी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. पाबळवाडी गावच्या ग्रामस्थांनी आम्ही करत असलेल्या विकासाच्या राजकारणाला साथ देण्याची भूमिका घेतली आहे, याचा आनंद असल्याची भावना मा.शंभूराज देसाई याप्रसंगी व्यक्त केली. तसेच पाबळवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच या ठिकाणी
स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.