पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त डॉ. विपीन इटनकर, नागपूर जिल्हाधिकारी पदावरून आयुक्तपदी लागणार वर्णी…!!
संभाजी पुरी गोसावी
राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी. फडणवीस यांच्या अत्यंत निटकचे अधिकारी आता एकेकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड शहरांचे सर्वेसर्वा होणार असल्याची चर्चा आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी आता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदासाठी डॉ. विपीन इटनकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. ते सध्या नागपूर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आयुक्त शेखर सिंह यांची तीन वर्षाची कारकीर्द पूर्णता झाल्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी त्यांची नाशिकला बदली करण्यात आली होती. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचा तात्पुरत्या स्वरूपाचा कार्यभार हा महामेट्रोचे व्यवस्थापकीय श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र पालिकेला नवीन आयुक्त कोण भेटणार हा प्रश्न अनुत्तरित होता. मात्र पिंपरी चिंचवडला नवे आयुक्त म्हणून डॉ. विपीन इटनकरांचे नाव चांगलेच समोर होते. त्यांचे नागपूर जिल्हाधिकारी पदावरून आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूर जिल्हाधिकारी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी आर. विमला मॅडम यांच्याकडून नागपूर जिल्हाधिकारी म्हणून 19 ऑगस्ट 2022 पासून नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ते २०१४ च्या महाराष्ट्र बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. यापूर्वी एमयूएचएस नाशिक आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मशीन युवा अभियानात उत्कृंष्ट कामगिरी केल्याने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात देखील आले होते. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असून शिस्तप्रिय आणि संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळखले जाते. डॉ.विपीन इटनकरांनी यापूर्वी विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी तर अन्य पदावर बदली झालेल्या जिल्ह्यामध्ये उत्कृंष्ट सेवा दिल्यामुळे सर्वत्रच त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वसामान्य नव्हे, तर बड्या नेत्यांमध्ये देखील आनंदाचे स्वर पाहायला मिळतात.