भोर येथे नवरात्रोत्सवासाठी देवी मूर्ती तयार.
भोर ता. २ : भोर तालुक्यात नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बनवून तयार झाल्या आहे. विविध रंगापासून तयार करण्यात आलेली, साडी नेसलेल्या देवीच्या मूर्तीला मंडळांकडून मोठी मागणी आहे.
गणेशोत्सवानंतर भक्तांना ओढ नवरात्रोत्सवाची असते. त्यासाठी देवीच्या मूर्तिकारांची लगबग सुरू असते, त्यामुळे मूर्ती साकारण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. भोर मध्ये यंदा नवरात्रोत्सवात तुळजापूरची महालक्ष्मी, दुर्गामाता, वाघावर स्वार, झालेली अंबामाता आदी विविध देवीचे रूपे बनवण्यात आले आहेत. मूर्ती बनविण्यासाठी लाल, हिरवा, गुलाबी, पांढरा, आदी रंगाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. रंगांसोबत मूर्तीला लावण्यात आलेली विविध आभूषणामुळे मूर्ती अधिक आकर्षक वाटते. साडी नेसलेल्या देवीच्या मूर्तीना पसंती मिळत असून, अशाच मूर्ती साकारण्याकडे कारागिरांचा कल आहे. या मूर्ती भोर तालुक्यातील सारोळे गावात ३,कामथडी, नसरापूर, भोर तसेच शेजारील खंडाळा तालुक्यातील विंग, गुठाळे, शिरवळ येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ घेऊन जाणार आहेत.
यंदा मूर्ती बुकिंग ला भोर तसेच खंडाळा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मूर्तीची किंमत चार हजार ते आठ हजारापर्यंत आहे.चार फुटापासून आठ फुटापर्यंत मूर्ती बनवल्या जातात. महागाई वाढली तरी मूर्तीच्या किंमत ग्रामीण भाग असल्याकारणाने वाढवल्या नाही.
राजेंद्र पांडुरंग कुंभार
श्री गणेश आर्ट मूर्तिकार भोर
आमच्या गावात तीन मंडळ आहे. दरवर्षी आम्ही मूर्ती यांच्याकडून घेतो. यांच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा तसेच मूर्ती खूप छान,सुरेख,असतात. किंमतही जास्त न घेता दरवर्षी मूर्ती आम्हाला देतात. पाच फुटापर्यंत देवीची मूर्ती आम्ही घेतो.
प्रणय पवार, आप्पा सणस, विजय शंकर धाडवे
नवरात्र उत्सव सारोळे.