सिंहगड अँकँडमीत गांधी आणि शास्त्री जयंती साजरी


कार्यकारी संपादक:  सागर खुडे

ADVERTISEMENT

शहरातील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संचालक शैलेश सर यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली. प्रथमत: माजी सैनिक सादिक शेख, विकास बनकर यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अँकँडमीचे सहसंचालक दिपक चव्हाण यांनी प्रास्ताविकेत गांधींचे इतिहासातील महत्वाचे स्थान यावर अत्यंत परीक्षाभिमुख मत व्यक्त केले. तद्नंतर अँकँडमीतील जीके. जी.एस फॅकल्टी प्रमुख एस. एन. नांदेडकर यांनी देशाचे दोन्ही महान सुपुत्र गांधीजी आणि शास्त्री यांच्या ऐतिहासिक कार्याची विद्यार्थ्यांना सविस्तर ओळख करून दिली. यावेळी रोहित आहेर सिंहगड अभ्यासिका संचालक, अनिकेत कदम, रविराज अहिवळे, राज वारणे, वैभव फिरंगे, गिरीधर खोत, गौरव भारती, हर्षल शिगवण, ओम क्षिरसागर आणि विद्यार्थींनी ऐश्वर्या गायकवाड, महानंदा कुसाळकर, श्रावणी शिर्के, सोनाली लोंढे,जान्हवी ढोने, संध्या चौरासिया, स्वाती कोळी, निकीता चलवाड, श्रृष्टी तेले, प्रियंका हंबीर,ऋषिकेश येनपुरे, तेजस दागडे, रितेश काडगी, प्रमोद शेळके यांच्यासह असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!