गुटखा विक्री व वाहतूक प्रकरणी राजगड पोलिसांची कारवाई ; 23,94,800/- रू. मुद्देमाल जप्त
गुटखा विक्री व वाहतूक प्रकरणी राजगड पोलिसांची कारवाई ; 23,94,800/- रू. मुद्देमाल जप्त
सारोळे : मंगेश पवार
भोर तालुक्यात अवैध गुटखा विक्री व वाहतूक प्रकरणी राजगड पोलिसांची कारवाई या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. 05 रोजी सकाळी 10/30 वाजण्याचे सुमारास मौजे कासुर्डी खेबा, ता. भोर जि. पुणे येथे सासवड ते खेडशिवापुर रोडवर कासुर्डी घाटामध्ये इसम नामे 1) चेतन दत्तात्रय खांडेकर वय 20 वर्षे, रा. कोथरूड, पुणे मुळ रा. निजामपुर, ता. सांगोला, जि. सोलापुर 2) प्रविण दत्तात्रय खांडेकर वय 23 वर्षे रा. कोथरूड पुणे मुळ रा. निजामपुर, ता. सांगोला, जि. सोलापुर यांनी संगनमताने महींद्रा बोलेरो पिकअप गाडी नं. एम MH- 12/QG-1043 ही मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल नावाचा सुगंधी पान मसाला, गुटखा व तंबाखू व वाहनासह असा एकुण किंमत
23,94,800/- रूपये चा खरेदी करून विकी करणेसाठी वाहतुक करीत असताना मिळून आला आहे. म्हणून त्यांचे विरोधात तंबाखू जन्य पदार्थ वाहतूक प्रकरणी राजगड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिक तपास पो.स.इ देठे करत आहेत.

 
			

 
							 
							