मोरवाडीत 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार श्री विठ्ठल-रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापना सोहळा
मंगेश पवार
दि. 24 सारोळे :- मोरवाडी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळ्याचे तीन दिवसीय भव्य आयोजन भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. कलशारोहन सोहळा श्री. शंकराचार्य विद्याशंकर नरसिंह भारती (करवीर पीठ, कोल्हापूर) व ह.भ.प. हनुमंत बापू जगताप (माहुर, बालब्रम्हचारी) यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
प्राणप्रतिष्ठापना विधी दत्तात्रय चंद्रकांत मोरे, अध्यक्ष – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, श्री. वेदमूर्ती मंदार श्रीकांत खळदकर गुरूजी (पुणे) व सौ. विजया दत्तात्रय मोरे यांच्या हस्ते पार पडत आहे.
शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत मूर्ती व कळसांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायं. 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री 9.30 वाजता नन्हे ग्रामस्थ मंडळ व विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ, वागजवाडी यांचा जागर कार्यक्रम होणार आहे. शनिवार 29 नोव्हेंबर रोजी सायं. 7 ते 9 वाजता महाप्रसादानंतर रात्री 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. जालिंदर महाराज नरवडे (अहिल्यानगर) यांचे कीर्तन होईल. त्यानंतर रात्री 11 वाजता भैरवनाथ भजनी मंडळ, कासुर्डी आणि ग्रामस्थ भजनी मंडळ, किकवी यांचे जागर सादर होणार आहेत.
रविवार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते सायं. 4 या वेळेत महाप्रसाद तर सायं. 4 ते 6 ह.भ.प. श्री. उध्दवजी महाराज चोले (परळी) यांचे कीर्तन होणार आहे.
त्यानंतर सायं. 7 ते 9 महाप्रसाद आणि रात्री 8 ते 10 ह.भ.प. श्री. मिलींद महाराज टम (पळशी), भजनसम्राट यांची भजनसेवा होणार आहे. कार्यक्रमाला व्यंकटेशराव (व्येंकिज ग्रुप), चंद्रकांत बाठे (मा. जि.प. सदस्य, पुणे), शंकर मांडेकर (आमदार, भोर–राजगड–मुळशी), विक्रम खुटवड (सदस्य, पुणे जि.नि. समिती), संग्राम थोपटे (मा. आमदार, भोर–वेल्हा–मुळशी) आणि रामकृष्ण नथु मोरे (ग्रा.पं. सदस्य, वागजवाडी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संपूर्ण सोहळ्याचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, मोरवाडी तसेच ग्रामस्थ महिला मंडळ, तरुण मंडळ, लोहोकरेवाडी व पाचलिंगे पंचक्रोशी यांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.


