शासकीय रुग्णालय, प्राथमिक शाळा येथील वेताळबाबा चे येथील धोकादायक गचपण काढणार कोण..?  ” सेल्फी विथ समस्या आंदोलनातून समस्यांचा पाढा सुरुच ” 


संपादक दिलीप वाघमारे

 

लोणंद नगरपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद लगतच असलेल्या वेताळबाबा देवस्थान दगडी कंपाऊंडचे आत अतिशय धोकादायक अस्ताव्यस्तपणे व घनदाट असे गवत, कांग्रेस, छोटी मोठी झुडपे वाढल्याने येथे गचपण झाले आहे (मोठे वृक्ष वगळुन ). यामुळे येथे व परिसरात लहान मोठे विषारी सर्पांचा वावर वाढला आहे तसेच मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे लगतच असलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणारे रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांना अचानक निघणारे विषारी सर्प व मच्छरांमुळे भितीचे वातावरण व खुपच त्रास सहन करावा लागत आहे.

ADVERTISEMENT

 

भयमुक्त व स्वच्छ, सुंदर लोणंद परिसरासाठी संबंधित विभागाच्या वतीने या गचपणची योग्य रितीने स्वच्छता करणे तसेच या ठिकाणी व परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुराडी देखील मारणे आवश्यक आहे परंतु या दुरावस्थांची सुधारणा होणार कधी…? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांनी सेल्फी विथ समस्या आंदोलनातून व्यक्त केली आहे व सेल्फी विथ समस्या आंदोलनात सातत्य ठेवून समस्या निदर्शनास आणत सदर समस्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले आहे प्रशासकीय यंत्रणा याबाबत काय भुमिका व दखल घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!