हडपसर रेल्वे स्टेशनच्या परिसरांत मुंढवा पोलिसांची दमदार कामगिरी, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघां आरोपींच्या आवळल्या मुसक्या…
संभाजी गिरी गोसावी ( पुणे शहर) प्रतिनिधी. संक्रात जवळ आली की पतंगबाचे अनेकांना वेध लागतात त्यासाठी अनेकजण बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर करीत असतात अशा नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर मुंढवा पोलीसांनी कारवाई करून दोन तरुण आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये मुंढवा पोलिसांनी 1 लाख 8 हजार 800 रुपयांचा मोनोफिल गोल्ड कंपनीचे नायलॉन मांज्याचे रील हस्तगत करण्यात आले आहेत. आयुष राहुल शिंदे (वय 20) रा. शिंदे निवास ससानेनगर हडपसर ) आणि यशराज विजय दिवेकर (वय 20 ) रा. हिंगणे मळा हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. मुंढवा पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार शिवाजी जाधव व पोलीस अंमलदार योगेश राऊत यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत हडपसर रेल्वे स्टेशन परिसरांत दोघेजण नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने मुंढवा पोलीस ठाणेकडील पथकांने हडपसर रेल्वे स्टेशन परिसरांत या दोघांचा शोध घेवुन त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास 1 लाख 8 हजार 800 रुपयांचे मोनोफिल गोल्ड कंपनीच्या नायलॉन मांजाचे रिल्स हस्तगत करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण करीत आहेत. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उद्भवले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक पोलीस निरीक्षक बाळासाहेब निकम स.पो.नि. राजू महानोर पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण पोलीस हवालदार शिवाजी जाधव राहुल धोत्रे शिवाजी धोंडे राहुल मोरे योगेश गायकवाड योगेश राऊत रुपेश तोडेकर स्वप्निल रासकर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

