मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गोंदवले येथील सावकारी छळास व जातीय मानसिकतेतून आत्महात्यागृस्त शिलेवंत कुटुंबाला न्याय कोन देणार दोन महिने होऊन सुद्धा पाच ही आरोपींना अटक नाही? याचा तीवृ निषेध!
उपसंपादक: दिलीप वाघमारे
सातारा :- मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील मौजे गोंदवले तालुका माण येथील मागासवर्गीय शेतकरी कुटुंबातील सुरज शिलेवंत याने त्याच व शेजारील गावातील खाजगी सावकारांच्या मानसिक शारीरीक छळाला व त्याच्या जातीय मानसिकतेला कंटाळून त्रास सहन न झाल्याने २७ जून २०२४ रोजी आत्महात्या केल्याचे समोर आल्यानंतर मात्र दहिवडी पो.स्टेशनला ०१ जुलै २०२४ ला आत्महात्तेस प्रवृत्तकरनणे,अणुसूचीत जाती-जमाती आत्याच्यार प्रतिबंधक कायद्या नुसार तसेच खाजगी सावकारीचा गुन्हा पाच संशयित आरोपीवर दाखल केला असताना मात्र आज अखेर संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने संबंधितांना पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली पाठिशी घालत आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाचा व शासन म्हणून मुख्यमंत्री व राज्याचे गॄहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांचा तीवृ शब्दात निषेध करणेत येत असल्याची माहिती पत्रकात रिपब्लिकन सेनेचे राज्यकार्यकारनी सदस्य चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.
यावेळी विविध सामाजिक राजकीय पक्ष संघटणांच्या वतीने तालुका व जिल्हा प्रशासनास वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा तसेच रिपब्लिकन सेनेच्या वतीने कोरेगाव तालूक्यात तहसील कार्यालयामोर तसेच खटाव तालूक्यात डि वाय एस पी वडूज यांच्या कार्यालयामोर निदर्शने आंदोलन करून तसेच जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांना तसेच अणुसूचीत जाती जमाती आयोगास निवेदने देऊन सुद्धा भेटणाऱ्या शिष्टमंडळास आश्वासन देऊन सुद्धा आज अखेर संबंधित गुन्हेगारांना अटक करण्यात यश आल्याचे दिसत नाही म्हणजे बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या धनडांडग्यांच्यावर कारवाई करण्याची मानसिकता जिल्हा पोलीस प्रशासनाची दिसत नाही तसेच एका मागासवर्गीय युवकास कराड येथील सह्याद्री हाँस्पीटल प्रशासन व तेथील डाँ.प्रसन्न पाटणकर यांच्या चूकीच्या ट्रीटमेंट व हलगर्जीपनामूळे १४/०४/२०२४ रोजी मृत्यूव झाल्याने संबंधीतावर सदोष मनूष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा याकरीता कराड शहर पो.स्टे.येथे फीर्याद देऊनसुद्धा आज अखेर गुन्हा दाखल करनेत आला नाही त्यामूळे संबंधीतानवर कारवाई न झाल्याने सर्वसामान्य कुटूंबात भितीचे वातावरन निर्मान झाल्याने या सर्व घटनाक्रमाची चौकशी अनुसूचीत जाती जमाती आयोगाने करावी अशी ही मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करणेत आली आहे.
सदर प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाने व जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित संशयित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई न केल्यास संबंधित पिडीत सुरज शिलेवंत यांनी संबंधित आरोपींच्या जातीय मानसिकतेच्या व सावकारी मानसिक व शारिरीक छळास कंटाळून २७ जुन २०२४ रोजी आत्महात्या केली त्या दिवसास २७ आँगस्ट २०२४ रोजी दोन महिने पूर्ण होत असल्याने त्या दिवशी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयामोर तसेच गुन्हा ०१ /०७/२०२४ ला दाखल झाला त्यालासूद्धा ०१ सप्टेंबर २०२४ रोजी दोन महिने पूर्ण होत असल्याने त्याच दिवसी जिल्हा पालक मंत्री यांच्या पोवई नाका येथील निवास स्थाना समोर सकाळी ११.३० वाजता रिपब्लिकन सेनेच्या वतीने निदर्शने आंदोलन करणेत येणार असल्याची ही माहिती राज्यकार्यकारनी सदस्य रिपब्लिकन सेना चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली.


